माळशिरस
पुरंदर तालुक्यात सासवड येथे महापरिवर्तन ट्रस्ट,बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान स्तंभाजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत व शालेय विध्यार्थ्यांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कृषी संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या अध्यक्षते खाली भारतीय संविधान या विषयावर बामसेफ चे राष्ट्रीय प्रचारक सुनील काका जाधव यांचा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना सुनील काका जाधव म्हणाले की संविधान हा सर्व भारतीयांचा आत्मा आहे.युवा पिढीला आणि बालवर्गाला संविधान समजेल अशा भाषेत समजून सांगण्याची गरज आहे.पोटातील तीन महिन्यांच्या बाळापासून ते त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा सर्व गोष्टी सन्मानाने करण्याचे हक्क आणि अधिकार संविधान देते.संविधानाच्या प्रत्येक कलमांचे त्यांनी विश्लेषण केले.यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक अमोल दादा लोंढे यांनी महापुरुषांच्या खऱ्या इतिहास उलगडून सांगितला.यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार म्हणाले की संविधान दिन हा एक दिवस साजरा न करता त्याची वर्षभर पारायणे झाली पाहिजेत.प्रत्येक राजकीय पक्षांच्या अजेंठ्यावर संविधान दिन हा असला पाहिजे.सहा हजार सातशे बेचाळीस जातींना एकत्र ठेवण्याची ताकत संविधानात आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष अभिजित जगतात,पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी ही संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ,सासवड नगर पालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे,नीरा मार्केट कमिटीचे सभापती नंदुकाका जगताप,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, सासवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब जाधव, पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर ,बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य सचिव कैलास धिवार ,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे,पत्रकार संघाचे पुरंदर तालुका अध्यक्ष योगेश कामठे उपाध्यक्ष प्रवीण नवले, पुरंदर पत्रकार संघ सचिव अमोल बनकर,आप्पासाहेब भडवलकर, संतोष डुबल,सहसचिव मंगेश गायकवाड, पत्रकार अमृत भडवलकर, ए टी माने, सुनिता कसबे, मंगल भडवलकर, राणी भडवलकर, छाया नानुगडे, रवि भालेराव, सिध्दार्थ यादव, सुशिल जगताप, उपस्थित होते.