पुरंदर
खळद(ता.पुरंदर) येथील प्रेरणा रोहित कामथे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली.
प्रेरणा कामथे यांनी उरुळी कांचन पुणे येथील पद्मश्री मिनाबाई देसाई कॉलेज येथून बीएससी मायक्रोबायोलॉजी ची डिग्री घेतली आहे. तर सिंहगड कॉलेज वडगाव पुणे येथून डी फार्मसी चे शिक्षण घेतले आहे. या दरम्यानच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या यामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी हे यश संपादन केले. तर नुकतेच त्यांची पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लेखनिक पदावर निवड प्रक्रियेतून निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. त्यांचे पती रोहित पोपट कामथे हे साउथ आफ्रिका येथे थ्री स्टार या कंपनीमध्ये सहाय्यक मॅनेजर या पदावर काम करीत असून त्यांचे व कुटुंबियांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.