पुरंदर मध्ये बुद्धिमत्तेची खाण

पुरंदर मध्ये बुद्धिमत्तेची खाण

पुरंदर

पुरंदर तालुक्याची ओळख जरी दुष्काळी असली तरी पुरंदर मधील माती, शेती, संस्कृती,ऐतिहासिक वारसायामुळे पुरंदरमधील जनतेमध्ये बुद्धीमत्तेची कमतरता नसल्याने आज सर्वच क्षेत्रात मुले अग्रेसर असल्याचे जिल्हा बँकेचेसंचालक प्रा दिगंबर दुर्गाडे यांनी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथे पुरंदरची कन्या तृप्ती कोलते पाटील यांची महाराष्ट्रातमहत्वाचा व सधन तालुका म्हणून असलेल्या हवेली तालुक्याच्या तहसीलदार पदी पहिलीच महिला तहसीलदार म्हणूननिवड झाल्याबद्दल राजेवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना सांगितले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे होते

राजेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हा  संस्थाचालक शिक्षण महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोलतेयांची निवड झाल्याबद्दल तसेच सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यापीठात प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाल्याबद्दल, तसेच हवेलीच्या तहसीलदारपदी तृप्ती कोलते पाटील यांची निवड झाल्या तसेच सेंट्रल रेल्वेच्या सदस्यपदी प्रवीण शिंदेयांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

यावेळी राजेवाडीचे माजी सरपंच संभाजीराव जगताप, शिवाजी जगताप, शशिकला कोलते, गौरव कोलते ,सरपंचरामदास जगताप,उपसरपंच आशा जगताप, सदस्य राजेंद्र शिंदे,दत्तात्रय जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदिप जगताप, तेजस ताकवले, संतोष जगताप, किरण जगताप, माऊली जगताप, बबन राऊत, शामराव जगताप ,डॉ तानाजीकाकडे,यांच्या सह शिंदवणे गावचे माजी सरपंच पंडितराव महाडिक माजी पोलीस पाटील पोपटराव महाडिक ,शिवाजीखेडेकर यांच्या सह राजेवाडीतील नागरिक कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *