नाशिक
नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नाशिकच्या मेरी शासकीय वसाहतीत हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. संजय वायकंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.संजय वायकंडे यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या.
त्या घरी परत येताच ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खून झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे