धक्कादायक !!!!    आधी सरण रचले,मग ठिबक सिंचनच्या जुन्या नळ्या टाकून त्यास स्वत:ला तारेने बांधले ; मी सर्वांचा ऋणी आहे असे म्हणत केली आत्महत्या

धक्कादायक !!!! आधी सरण रचले,मग ठिबक सिंचनच्या जुन्या नळ्या टाकून त्यास स्वत:ला तारेने बांधले ; मी सर्वांचा ऋणी आहे असे म्हणत केली आत्महत्या

अहमदनगर

अहमदनगरच्या सोनई लोहरवाडीमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. जिल्ह्यातील सोनई लोहारवाडी ( ता.नेवासे) शिवारात शनिवारी मध्यरात्री २७ वर्षीय तरुणाने आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने शेतात लाकडाचे सरण रचून त्यावर ठिबक सिंचनच्या जुन्या नळ्या टाकून त्यास स्वत:ला तारेने बांधून विचित्र पद्धतीने आत्महत्या केली आहे.

अनिल साहेबराव पुंड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सोनई लोहारवाडी ( ता.नेवासे) शिवारात २७ वर्षीय अनिल साहेबराव पुंड याने आत्महत्या केली आहे. लोहारवाडीतील घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिलने शेतात लाकडाचे सरण रचून त्यावर ठिबक सिंचनच्या जुन्या नळ्या टाकून त्यास स्वत:ला तारेने बांधून आत्महत्या केली आहे.

या घटनेच्या मागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.लोहारवाडी येथील घटनेची खबर मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आज घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.आत्महत्येच्या पूर्वी रात्री दीड वाजता अनिलने बहीण व मावशीला व्हाट्सअप वर मॅसेज पाठविला होता.

घरात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत माझ्या मृत्यूस मीच कारणीभूत असून मी सर्वांचा ऋणी आहे, असे लिहून ठेवत मोबाईलचा लॉक-पॅटन लिहून ठेवलेला होता, असे पोलीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *