नाशिक
येवला तालुक्यातील जउळके या ग्रामपंचायतीच्या जनतेतून निवड झालेल्या सरपंच ज्योती प्रभाकर खैरनार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 पोट कलम 14 ग मधील तरतुदीचा भंग केल्या प्रकरणी पुढील काळासाठी अपात्र घोषित केले आहे.http://aapulkivivahsanstha.com
अधिक माहिती अशी की एप्रिल 2020 या कोरोना महामारी काळात जउळके ग्रामपंचायतीने गावा मध्ये सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करणे तसेच टीसयल पावडर खरेदी व इतर काही कामांसाठी चौके ग्रामपंचायतच्या जळगाव नेऊर येथील बँक ऑफ बडोदाच्या खात्यामधून आपले पती प्रभाकर खैरनार यांना 5500 व 7000 अशा रक्कम अदा केल्या.http://aapulkivivahsanstha.com
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या तरतुदीनुसार लोकप्रतिनिधी यांनी स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी कोणत्याही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यवहारात सहभागी होऊ नये अशी तरतूद असताना देखील पतीच्या नावाने रक्कम काढल्याने सरपंच खैरनार यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे असे निकालात स्पष्ट नमूद करण्यात आल आहे सदर काढण्यात आलेली रक्कम फार मोठी नाही मात्र ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.http://aapulkivivahsanstha.com