पुणे
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नदीपात्रात बांधलेल्या एका रेडकासोबतच एका तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर अनैसर्गिक कृत्य तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.27 ऑक्टोबर रोजी फिर्यादी आणि त्याचा एक मित्र वृध्देश्वर-सिध्देश्वर घाट परिसरात कॉफी पित असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्यांना येऊन सांगितले की, बालगंधर्व पुलाखाली गुरांच्या गोठ्या जवळील एका झाडाला बांधलेल्या म्हशीच्या रेडकुसोबत एक व्यक्ती अनैसर्गिक कृत्य करत आहे. त्यानंतर फिर्यादी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
फिर्यादी यांनी देखील एक व्यक्ती रेडकुसोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे पहिले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.फिर्यादीला पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र फिर्यादीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. नाव विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव दिपक असल्याचे सांगून तो नेपाळचा असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा पळ काढला.
अंधारातून पळून जात असताना आरोपी रोडवर पडल्याने त्याला मार लागता. तसेच हा प्रकार जमलेल्या लोकांनाही समजल्याने लोकांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रूग्णालयात नेले. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.