खाकी वर्दीला काळीमा !!!!!                               चक्क पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार,गुन्हा दाखल होताच झाला फरार

खाकी वर्दीला काळीमा !!!!! चक्क पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार,गुन्हा दाखल होताच झाला फरार

मुंबई

नालासोपारा येथे पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण मीरा भाईंदरमधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असणार्या एका पोलिसाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

राहुल लोंढे असं मीरा भाईंदर मधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांचे नाव आहे.

या आरोपी पोलिसाविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपी पोलीस फरार झाला असून त्याचा अद्याप त्याचा ठिकाणा लागलेला नाही.

पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. शिवाय आरोपी राहुल लोंढे यांच्या तर त्याची प्रियसी प्रिया उपाध्य यांच्यावर नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *