पुणे जिल्ह्यातील “या” गावात महिलेच्या वेशात फिरत होता तरुण; स्थानिकांनी धू-धू धुतलं

पुणे जिल्ह्यातील “या” गावात महिलेच्या वेशात फिरत होता तरुण; स्थानिकांनी धू-धू धुतलं

पुणे

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरण परिसरात एका परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

हा तरुण महिलेच्या वेशात फिरत असल्याने तो मुलं पळवणाऱ्या टोळीचा भाग आहे. असा आरोप करत त्याला स्थानिकांनी जोरदार चोप दिला आहे. खडकवासला धरण परिसरातील मागच्या बाजूला एक तरुण महिलेच्या वेशात फिरत होता. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणाला विचारणा केली.

त्यानंतर मुलं पळवणाऱ्या टोळीचा भाग आहे असं समजून स्थानिकांनी या तरुणाला जोरदार चोप दिला.खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूवर असलेल्या पुलावर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये स्थानिक नागरिकांसह काही तरुण या महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.दरम्यान, या तरुणाला जिथे मारहाण झाली ती हद्द हवेली पोलिसांची की उत्तमनगर पोलिसांची याबाबत मात्र, अद्यापही स्पष्टता झालेली नाही. महिलेच्या वेशात फिरत असल्याने नागरिकांनी गैरसमजातून ही मारहाण केल्याची प्राथामिक समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *