पुणे
रस्त्यातील खड्डे ही सर्वच ठिकाणची समस्या आहे. खड्ड्यांनी त्रस्त नागरिक अनेकदा आपली संतप्त प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र पुण्यातील खड्ड्यांबाबत वैतागलेल्या पुणेकरांनी त्यांच्या स्टाईलने आंदोलन केलं आहे. पुणेकरांची खड्ड्यांविरोधात नामी शक्कल लढवली आहे.
खड्ड्यांविरोधात नागरिकांनी रस्त्यातच पुणेरी पाट्या लावत आपला संताप व्यक्त केला आहे. सासवड रोडवरच्या सद्गुरू सोसायटीमधील रहिवाशांनी या पाट्या लावल्या आहेत.
सद्गुरू सोसायटीने पाट्या लावल्या असलेल्या तरी प्रशानसाने याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. रस्त्याची दुरावस्ता पाहून बाहेर निघताना भीती वाटते. याठिकाणी अनेक अपघात होतात, यात काहींचा मृत्यू झाला आहे. अनेक संसार या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उद्ध्वस्त झाले आहेत.
त्यामुळे ही समस्या प्रशानाने सोडवली पाहिजे. प्रशासाने आमच्या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर येत्या काळात आम्ही येथे रास्तारोको आंदोलन करु. तसेच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही आम्ही घेऊ, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासवड रोडवर येऊ नका”, “एकतर रस्ता मिळेल, नाहीतर खड्डा दोन्ही लाड एकत्र फक्त पुणे महापालिका पुरवणार”, यासह इतर पट्या लावत नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.
गणोशोत्सव संपल्यानंतर अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या दिसून येत आहे. गणोशोत्सव मंडळांनी मंडप काढले मात्र मंडप उभारणीसाठी केलेले खड्डे तसेच ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे आधीच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये यामुळे भर पडली आहे.