पुणे
तब्बल ४४ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कुलबस खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे.
आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगावची स्कुलबस गिरवली येथील आयुका दुर्बिण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथे आयुका दुर्बिण पाहून झाल्यावर परतीच्या प्रवास करत असताना एका वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत गेली.
धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये तब्बल ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शिवाय या घटनेमध्ये ४ शिक्षक किरकोळ तर ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन घटनास्थळी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरु आहे. पोलिसांनी या अपघाताची दखल घेतली असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.