पुणे
विद्युत खांबावरील तार तुटून अंगावर पडल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. सदर घटना भोर तालुक्यातील वरवडी गावात घडली आहे. सुभद्रा सोनबा वरे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
शेतात काम करीत असताना अंगावर विजेची तार पडून वृद्ध महिलेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सुभद्रा वरे असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे. भोर तालुक्यातील वरवडी खुर्द गावातील ही दुर्दैवी घटना आहे. सुभद्रा आजी या सोमवारी दुपारी शेतात शेंगा काढत होत्या.
या दरम्यान गावातील लघुदाब वाहिनीची तार पाऊस, वाऱ्यामुळे तुटून अंगावर आजींच्या अंगावर पडली.यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वारा, पावसात अनेकदा तार तुटत असतात. परंतु, वारा– वादळानंतर सर्व विद्युत तारांची पाहणी करणे आवश्यक आहे. परंतु, महावितरणकडून हे होत नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही दुदैवी घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.