मुंबई
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.
जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणांवर टीका केली आहे. राणांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.
शिवाय शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्या आहेत.