पुरंदर तालुक्याच्या “या” गावातील महिला शिक्षिकेला मिळाला “आदर्श शिक्षिका” पुरस्कार ; मग काय पुर्ण गावाचा बहुमान वाढल्याने गावाने केला त्यांचा सन्मान

पुरंदर तालुक्याच्या “या” गावातील महिला शिक्षिकेला मिळाला “आदर्श शिक्षिका” पुरस्कार ; मग काय पुर्ण गावाचा बहुमान वाढल्याने गावाने केला त्यांचा सन्मान

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे प्रतिष्ठान,पुरंदर यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाधववाडी (केंद्र – दिवे) शाळेच्या आदर्श, उपक्रमशील शिक्षिका सौ.सुरेखा सुनील लोणकर यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

त्यानिमित्ताने समस्त भिवरीकर ग्रामस्थांनी देखील एकत्रितरित्या येत ग्रामदैवत भैरवनाथ- जोगेश्वरी मंदिरात सौ.सुरेखा लोणकर यांचा भव्य सन्मान केला.

अशाप्रकारे समस्त भिवरी येथील ग्रामस्थ एकत्रित येवून उत्कृष्ट व आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्याने निश्चितच यापुढेही शैक्षणिक , सामाजिक,कौटुंबिक काम करण्यासाठी आणखी जबाबदारी वाढली व प्रोत्साहन मिळाल्याचे यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुरेखा लोणकर यांनी सांगितले.

तर सुरेखा लोणकर यांसारख्या आदर्श, गुणवंत उपक्रमशील व तंत्रज्ञस्नेही शिक्षिकेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून “आचार्य अत्रे प्रतिष्ठानने दिलेला पुरस्कार निश्चितच भिवरीकर ग्रामस्थांना अभिमानास्पद वाटतो.या शिवाय त्यांचे पती, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ,दै. लोकमतचे पत्रकार, शिक्षकनेते, हॉटेल लोणकरवाड्याचे मालक मा.सुनिल लोणकर यांचा सुद्धा शैक्षणिक कार्यासह सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग असतो.

सातत्याने अनेक गरजू , उपेक्षित, वंचित व्यक्तींच्या मदतीला धावून जात मदत करतात. त्यासाठी पत्नी सुरेखा लोणकर यांची खंबीर साथ, तसेच एकत्रित कुटुंबाची जबाबदारी म्हणून सुरेखा लोणकर या प्रमुख व महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत असल्याबद्दल देखील सुरेखा लोणकर यांचा निश्चितच अभिमान वाटतो. एकत्रित लोणकर परिवार तालुक्यातील एक आदर्शवत, प्रेरणादायी कुटुंब मानले जाते..”असे यावेळी भिवरीकर ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *