पुणे
पुरंदर तालुक्यात प्रथमच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम सन 2016 चे कलम 92 (ए)(ब) सरपंच विरूद्ध गुन्हा दाखल झाला आसुन तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मौजे हरगुडे येथील सरपंच भुषण रविंन्द्रनाथ ताकवले व रविंन्द्रनाथ बाबुराव ताकवले यांच्या विरोधात 323, 500, 504, 506, 34 दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम सन 2016 प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला असून या संदर्भात फिर्यादी – मोहन सर्जेराव ताकवले वय 54 धंदा नोकरी (प्राचार्य) मुळ गाव हरगुडे ता. पुरंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, ता.23/08/2022 रोजी सकाळी साडे दहा वा.चे.सुमारास मौजे हरगुडे ता. पुरंदर जि. पुणे गावचे हद्दीत श्री जानाई मंदीर परिसरात ग्रामसभा असल्याने ग्रामसभेत गोंधळ झाला त्यावेळी इसम नामे 1)रविंन्द्रनाथ बाबुराव ताकवले याने मला मी दिव्यांग असल्याने मला दिव्यांगा वरून बोलून तसेच लंगड्या, फेगड्या बोलून माझा सार्वजनिक ठिकाणी हेतूपुरस्कर व जाणीवपुर्वक अपमान केला तसेच 2)इसम नामे भुषण रविंन्द्रनाथ ताकवले याने शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली आहे. म्हणून माझी त्यांचे विरूद्ध फिर्याद आहे. पुढील तपास असून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.