पुणे
पुरंदर तालुका पत्रकार संघाकडून पुरंदर तालुक्यात भव्य असे पत्रकार भवन उभारणीचे काम सुरू आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती भागात पुणे पंढरपूर महामार्गालगत हे भवन उभारण्यात येणार असून ही प्रक्रीया सुरू आहे.
पत्रकार संघाच्या या भवनाच्या उभारणीला पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांनी त्यांचे दिवंगत वडील स्व.मारुती आबा झुरंगे यांच्या स्मरणार्थ सहा लाख रुपयांचा धनादेश पत्रकार संघाकडे सुपूर्त केला.
पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर,सहसचीव मंगेश गायकवाड,पत्रकार हल्ला विरोधी कृतीसमितीचे अध्यक्ष बी एम काळे,जेष्ठ पत्रकार प्रकाश फाळके, सदस्य अमृत भांडवलकर आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात पुरंदर तालुका पत्रकार संघाकडून पत्रकार भवन उभारण्यात येत असून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पत्रकारांना समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात मिळावा असे आवाहन पत्रकार संघाकडून करण्यात येत आहे.