बीड
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे बायकोच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश सुरेश मुळे (वय २५) असं मयत तरुणाचे नाव आहे.
आकाश सुरेश मुळे वय २५ रा. बाबणे पागंरी, ता. बदनापूर जि. जालना हमु. बाबा पेट्रोल पंपासमोर माजलगाव असं मयत तरुणाचे नाव आहे. आकाश मुळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आत्महत्या का करतोय ? हे देखील सांगितले आहे.
हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आकाश याने माजलगाव परिसरातील जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या ऐगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.