पुणे
आज जिल्हा परिषद पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.श्री.भगत सिंह कोशारी जी यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत मिरवडी ला आर आर आबा स्वच्छ व सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान विशेषतः ग्रामपंचायत कार्यकारिणी,आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ,कर्मचारी,आरोग्य,शिक्षण,वृक्षारोपण, स्वच्छता व इतर नाविन्यपूर्ण उपक्रमातील सर्व सहभागी सहकारी यांचे यश आहे व या संपूर्ण प्रक्रियेत दौंड चे गटविकास अधिकारी श्री.येळे साहेब , विस्तार अधिकारी ताकवणे साहेब , मुलानी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त झाले. : सरपंच सागर शेलार, ग्रामपंचायत मिरवडी
या पुरस्कारात सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व 10 लाख रुपये अशे स्वरूप होते हा सन्मान मिरवडी चे सरपंच श्री.सागर शेलार व ग्रामसेवक सौ.रेश्मा जाधव यांनी स्वीकारला.