पुरंदर
गुन्हेगारीचा शिक्का माथी असलेला फासेपारधी समाज हा आजही समाज्याच्या मुख्य प्रवाहात नाही. शिक्षण, स्वच्छता, आरोग्या या मुख्य बाबींनकडे ही ते दुर्लक्ष करतात. या समाजाला इतर समाजा बरोबर उभे करायचे असल्यास सर्वांनी त्यांना सोबत घेऊन, विश्वास देत, प्रामुख्याने त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेणे नितांत गरजेचे आहे, असे मत नाना जोशी यांनी व्यक्त केले.
सामाजिक समरसता मंच पुरंदरच्या वतीने फासेपारधी समाजाचे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यासाठी नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजित केला होता. यावेळी नाना जोशी बोलत होते. पारधी समाजाचे वतीने आंबर शिंदे, पिंपरे बुद्रुक येथील पोलीस पाटील पूनम शिंदे, आक्रम काळे समाजाच्या वतीने यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सामाजिक समरसता मंचचे शेॅलेंडर ठकार, शामराजे कुंभार, बाळासो भोसले, आणा माने, मच्छिन्द्र लकडे, भैय्या जेधे, नाना जोशी, उपस्तित होते. यावेळी पारधी समाजाती शालेय विद्यार्थ्यांना दिलीप जगताप मित्र परिवाराच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.