अभिमानास्पद !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या ग्रामस्थांनी केला विधवा प्रथा बंद करण्याचा संकल्प

अभिमानास्पद !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या ग्रामस्थांनी केला विधवा प्रथा बंद करण्याचा संकल्प

पुरंदर

मासूम संस्थेच्या वतीने पिंपरी येथे भैरवनाथ मंदिरात झालेल्या कार्यक्रमात नुकताच महाराष्ट्र शासनाचा विधवा प्रथा बंद करण्याचा आलेला अध्यादेश बाबत मासूम संस्थेच्या कार्यकर्त्या वैशाली ताई कुंभारकर यांनी संवाद साधला.महिलांना सन्मानाने जगण्यासाठी समाजातून अशा अन्यायकारक प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत.

त्यामध्ये फक्त विधवा महिलाच नाही तर परितक्ता, मुल होत नसणाऱ्या किंवा फक्त मुलीच असणाऱ्या महिलांना व लग्न न करणाऱ्या महिलांना समाजातून मिळणारी अन्यायकारक वागणूक बंद झाली पाहिजे आणि त्यामध्ये गावातील सर्व नागरिकांनी भूमिका घेणे गरजेचे आहे असे आव्हान त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना केले. गावातील सर्व विधवा, परीतक्ता महिलांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

यापुढे कोणताही सण उत्सव असला तरीही सर्व महिलांमध्ये कोणताही भेदभाव न करता एकत्र साजरा करणार असे सर्व महिलांनी ठरविले.आणि यापुढे कोणत्याही महिलेच्या पती चे निधन झाले तरी तिचे कोणतेही अलंकार काढले जाणार नाही असा संकल्प सर्व महिलांनी व ग्रामंचायतीने केला .

विधवा प्रथा बंद करण्याचा प्रस्ताव कृषिभूषण महादेव शेंडकर यांनी यावेळी बोलत असताना मांडला व त्याला सर्व गावकऱ्यांनी हात उंचावून समर्थन केले.याबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन शेंडकर यांनी दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पातळीवरील एकल महिला संघटनेच्या सदस्य उषा ताई चव्हाण या होत्या.

यावेळी माजी सरपंच मीनाताई शेंडकर सोसायटी चेअरमन विजय थेऊरकर,उपसरपंच योगिता थेऊरकर,मनुताई थेऊरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली सुतार यांनी केले. स्वागत वर्षा थेऊरकर व प्रास्ताविक शितल चव्हाण. आणि आभार शितल तांबे यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मासूम च्या कार्यकर्त्या मोनाली म्हेत्रे व गावातील महिलांनी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी गावचे सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच ,सदस्य,सोसायटीचे चेअरमन व्हाय चेअरमन आणि सर्व सदस्य तसेच गावातील सर्व महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *