पुरंदर
सासवड पोलिस स्टेशन येथे संग्राम शिवाजी कोलते वय 40 वर्षे, व्यवसाय -ई सेवा केंद्र. रा. 121 ब सोपाननगर सासवड ता पुरंदर जि पुणे यानी शिवाजी गुलाब कोलते रा सोपाननगर सासवड ता पुरंदर जि पुणे यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे पिसर्वे ता पुरंदर जि पुणे येथील शेतजमीन गट नंबर 512 मधील 27.875 आर एवढी जमीन शिवाजी गुलाब कोलते, रा सोपाननगर सासवड यांनी माझे वडील शिवाजी राघु कोलते यांना वेगवेगळी आश्वासने देवुन त्यांची फसवणुक करून खरेदीखत करून घेतले. त्यांनी दि.07/09/2011 रोजी खरेदीखत नंबर 4509/3/16, करून घेतले. त्यावेळी आमचे वडीलांचे 7/12 वरील नाव कमी झाले व शिवाजी गुलाब कोलते यांचे नाव 7/12 वरती आले तेव्हा आम्हाला जमीन खरेदी करून घेतल्याचे समजले. मी सब रजिस्टर सो. पुरंदर, सासवड यांचे कार्यालयात स्वतः जावुन खरेदी खताची नक्कल काढुन घेतली. तदनंतर मी वडीलांना विचारले की, मला व घरात कोणालाही न विचारता जमीन का विकली.
आपल्याना जमीन विकण्याचे कोणतेही कारण व आर्थीक आडचणन व्हती. तेव्हा वडीलांनी सांगीतले की, शिवाजी गुलाब कोलते हे मला म्हणाले की, आपण त्या जागेत इग्लीश मेडीअम स्कुल दोघात मिळुन काढु. स्कुल कमीटीच्या बाॅडीमध्ये तुम्हाला घेतो. तेथे शाळा उभारल्या नंतर त्या शाळेला तुमच्या दादाचे नाव (कै.राघु नामदेव कोलते) देवु. इग्लीश मिडीअम स्कुलचा सर्व पत्र व्यवहार व परवानग्या आणन्यासाठी दोघांच्या नावे अॅग्रीमेंन्ट करून घेवु असे सांगुन फसवुन कचेरीवर सासवड येथे घेवुन गेले व सब सब रजिस्टर सो यांचे कार्यालयात जावुन माझी सही घेतली त्यांनी जमीनीचे खरेदीखतच करून घेतले. असे सांगीतले
सन 2011 साली खरेदीखत केले त्यावेळी मी व माझी बहीण सौ वर्षा रविंद्र भिंताडे दोघेही कायदयाने सज्ञान असताना खरेदीखतावर माझे वडीलांचे वाली वारस म्हणुन माझी व माझया बहीणीची समती घेण्यात आली नाही. तसेच खरेदीखताबाबत आम्हाला कोणतीही माहीती देण्यात आली नाही.
त्यानंतर माझे वडीलांना घेवुन मी स्वतः शिवाजी गुलाब कोलते यांचेकडे गेलो. खरेदीखताबाबत विचााराणा केली असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देवुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली. मी तुमची जमीन खरेदी खत करून घेतली आहे, जर तुम्हाला तुमची जमीन परत हवी असेल तर तुम्हीमला एकर कमी 20,00,000/- रू दया. असे म्हणाले
शिवाजी गुलाब कोलते यांनी आमचे वडीलांकडुन फसवणुक करून खरेदीखत करून घेवुन दस्तावर 50,000/- रू रोख दिल्याचे दाखवित आहेत. परंतु आजपर्यंत आम्हाला किंवा आमच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची रक्कम त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे मानसिक संतुलन पुर्णपणे बिघडलेले आहे.
शिवाजी गुलाब कोलते यांनी सदर जागेत इंग्लीश मिडीयम स्कुल काढण्याचे खोटे कारण सांगुन 2011 मध्ये खरेदीखत करून घेतले. परंतु सन 2011 पासुन ते आजपर्यंत सदर जागेत इंग्लीश मिडीयम स्कुल उभारण्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे काम त्यांनी केलेले नाही व खोटे बोलुन माझे वडील शिवाजी राघु कोलते यांची फसवणुक केली आहे.
तरी दि.07/09/2011 रोजी मौजे सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे येथे शिवाजी गुलाब कोलते, रा.सोपाननगर सासवड, ता.पुरंदर, यांनी माझे वडील शिवाजी राघु कोलते यांना तुमच्या पिसर्वे येथीत शेतजमीन गटनं 512 क्षेत्र 27.875 आर यावरती इंग्लीश मिडीयम स्कुल दोघात मिळुन काढु असे खोटे सांगुन खरेदीखत करून घेतले.अदयाप पर्यंत इंग्लीश मिडीयम स्कुल उभारण्याचे कोणतेही स्वरूपाचे काम न करता त्यांनी माझे वडीलांची फसवणुक केली आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महांगडे करित आहेत.