पालखी माघारी फिरायच्या आत रस्ते वाहून गेले ; पुरंदर तालुक्यातील “या” शहराचे पाच कोटी रुपये पाण्यात !!!!

पालखी माघारी फिरायच्या आत रस्ते वाहून गेले ; पुरंदर तालुक्यातील “या” शहराचे पाच कोटी रुपये पाण्यात !!!!

पुरंदर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी शहरातील रस्ते २० ते २२ जूनच्या दरम्यान डांबरी करण्यात आले. पण अवघ्या १८ दिवसात सगळे रस्ते वाहून गेल्याने सासवडकरांच्या घामाचे ५ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. नेहमीप्रमाणे या रस्त्यांच्या कामातली बरीच मलई ‘बंगल्यावर’ गेल्याने सर्व कामांना चुना लागल्याची चर्चा विरोधी नगरसेवकांमध्ये रंगली होती.

सासवड शहरात जवळपास ५ कोटी रुपये खर्चून जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. २४ जूनला पालखीचे सासवडला आगमन झाले. पालखी जेजुरीपर्यंत पोचताच इकडे रस्ते उखडू लागले. पालखीने निरा ओलांडून तालुक्याच्या बाहेर पाऊल ठेवेपर्यंत निम्मे रस्ते धुळीस मिळाले. आषाढी पार पडली आणि पालखी माघारी फिरेपर्यंत सगळे रस्ते वाहून गेले.

सासवड नगरपालिकेच्या कारभारातील प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराने शहरात बजबजपुरी माजली आहे. नगरपालिकेने पाच वर्षात पहिल्यांदाच रस्त्यावर डांबर टाकले पण त्याचे महिनाभरही सुख नागरिकांना मिळाले नाही.

पाच वर्षाचे पैसे गेले कुठे ?
सासवड शहरात ५ वर्षात एकदाही रस्त्यांचे डांबरीकरण झाले नव्हते. मग या ५ वर्षात आलेला निधी कुठे गेला याबाबत नगरपालिका कुठलीही माहिती देत नाही. स्वच्छता बक्षीस म्हणून मिळालेले १५ कोटी तर कुठे गायब झाले त्याचा तपासच नाही. त्यामुळे अंडी न खाता शहरात कोंबडीच कापून खाल्ली जात आहे असे दिसते. मागच्या २५ वर्षात पालिकेचा किती पैसा लुटला गेला असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *