सोलापूर
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरूजींनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे. डिसले गुरुजींनी हा राजीनामा ७ जुलै रोजी दिला. डिसले गुरूजींच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
डिसले गुरुजींचे काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागामध्ये वाद झाले होते. ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजी यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे कारण पुढे आले होते.
ही माहिती शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी सदर माहिती दिली होती. त्यानंतर डिसले गुरूजींनी एका मुलाखतीत नोकरी सोडण्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, तरीही डिसले गुरूजींनी ७ जुलै रोजी राजीनामा का दिला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप त्यांना जाहीर झाली होती. तसेच पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठातील अधिक संशोधन करण्यासाठी गुरूजींना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. डिसले गुरूजींसहित जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.
रणजितसिंह डिसले यांची जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्ष म्हणून कार्य केले. डिसले गुरूजींनी शिक्षण क्षेत्रात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ४ डिसेंबर २०२० रोजी ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती.