फसवणुक करुन जमीन खरेदी केल्या प्रकरणी तालुक्यातील “या” पक्षाच्या बड्या नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल

फसवणुक करुन जमीन खरेदी केल्या प्रकरणी तालुक्यातील “या” पक्षाच्या बड्या नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे मुलाच्या  मनोविकलांगतेचा गैरफायदा घेत आईच्या परस्पर जमिनीची खरेदी केल्या प्रकरणी त्या मुलाच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रजनी महादेव घाटे वय 60 वर्षे ,  रा.पठारवाडी, पो.भिवरी, ता.पुरंदर, जि.पु. यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे . 

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  फिर्यादी यांचा  मोठा मुलगा संदीप हा पुण्यात राहतो. दुसरा मुलगा दिपक हा अहमदाबाद येथे वास्तव्यास आहे आणि  त्यांचा  लहान मुलगा अमित हापॅरा नाॅईडषिझोफ्रेनियाचा पेशंट आहे. व तो गेले 5 ते 6 वर्षे परागंदा आहे.

फिर्यादी यांनी  सन १९९४  साली लहान मुलगा अमित याचे नावे तो आठ वर्षाचा असतान भिवरी येथे गटनं. 5142 मध्ये क्षेत्र 2 हेक्टर 73 आर त्याचे नावे घेतली होती. ही फिर्यादी यांनी  नुकतेच या मिळकतीचे 7/12 उतारे काढल्याने  सदर मिळकतीचे 7/12 वरती संदीप जगदाळे या त्यांच्या  नातेवाईकांचे नाव आढळून आले.  तद्नंतर ऑनलाईन सुची क्र. 2  काढले असता त्यामध्ये संदीप जगदाळे यानी सदर मिळकती पैकी 80 आर मिळकत खरेदी घेतल्याचे आढळून आले.

सदर खरेदी खताचा दस्तक्र. 46252021 असा आहे. फिर्यादी यांनी त्याना त्याचा जाब विचारला असता त्यानी तुमचा भाऊबंदा पैकी असलेले एजेंट प्रथमेश घाटे याच्या मध्यस्तीमुळे खरेदी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. एजेंट प्रथमेश घाटे व संदीप जगदाळे याना  फिर्यादी यांचा  मुलगा अमित मनोविकंलाग असल्याचे माहीत असून देखील गट नं. 5142 या मधील 80 आर अन्वये खरेदी दस्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *