पुरंदर
पुर्ण महाराष्ट्रात सध्या वारीचे वारे सुरु असताना या वातावरणात आंबळे गावातील श्री शिवाजी विद्यामंदिर हे मागे नाही राहु शकत हे आज शाळेने दाखवुन दिले.
शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्म व संत साहित्याचा अभ्यास व्हावा तसेच पुर्ण महाराष्ट्रातुन वारकरी हे पंढरपुरला वारीनिमित्त जातात व पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतात हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या अनुषंगाने आज शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन केले होते.
सदर दिंडी पाहताना आंबळे ग्रामस्थांचे मन भारावुन गेले होते व ही संकल्पना आजपर्यंत या शाळेतील मुख्याध्यपकांनी कधीच राबवली नव्हती व ही संकल्पना मुख्याध्यापकांनी राबवली याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका निना चव्हाण, शिक्षक सुनिल हैंद्रे,जितेंद्र अवताडे,श्रद्धा भट्टी,स्मिता शेळके,शरद आव्हाड,माऊली घाडगे यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले होते.