पुणे
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. या परिषदेचे शरद पवार अध्यक्ष आहेत. भारतीय कुस्तीगीर महासंघाने ३० जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला आहे. राज्य कुस्तीगीर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या, तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष करत होते, अस यात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धा आयोजित करणे, आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्तीसाठी पुढच्या काही दिवसात अॅड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे.
भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. परिषद रद्द करण्यामागील हे कराण असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज्यातील मल्लांच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच २३ वर्षाखालील स्पर्धांना राज्या कुस्तीगीर परिषद तयार झाली नाही, असंही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.