पुरंदर
सासवड, दळवी आळी (ता पुरंदर) येथे ओमनी गाडीमध्ये एल.पी.जी गॅस भरताना अचानक पेट घेतल्याने एक जण जखमी झाला असून शेजारील एका दुचाकीला देखील आग लागली आहे. हि घटना सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सासवड शहरातील दळवी आळी येथे घरगुती गॅस हा ओमनी गाडी नंबर एम.एच १२ बी.जी २१३३ त्यामध्ये शिवाजी गणपत दळवी ( वय ४२ ) हे दळवी आळी येथील त्यांच्या घरा समोर गॅस भरत असताना गाडीने पेट घेतला यानंतर त्या ज्वालाग्रही गॅस मुळे शेजारील दुचाकीला व शेजारील घराच्या दरवाजा त्याचबरोबर घराच्या खिडक्याच्या काचा फुटल्या होत्या तर आग लुगुन गाडीचे नुकसान झाले आहे.
हि आग परिसरातील नागरीकांनी बोरवेअलच्या पाण्याने आटोक्यात आणली. आग पूर्णपणे विझवली गेली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आसल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.