पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुणे जिल्हा बँकेत पैसे काढायला गेलेल्या वकिलाला येथे असणाऱ्या दोन अनोळखी महिलांनी चांगलीच हातचलाखी दाखवली आहे यामध्ये त्यांचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले आहेत.
या बाबत त्या वकिलाने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम ३७९ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात वकील असलेले व खानवडी तालुका पुरंदर येथे राहणारे स्वप्नील एकनाथ होले यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानीं दिलेल्या फिर्यादी नुसार काल दिनांक 28 रोजी सासवड येथे जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी ७५ हजार रुपये काढून त्यांच्या बॅग मध्ये ठेवले होते.थोडावेळ ते त्यांच्या मित्र सोबत बोलत असताना संशयित दोन महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या .
त्यातील एका महिलेने त्यांच्या बॅग मधील पन्नास हजाराचा बंडल काढून घेतला.याबाबाच सिसी टिव्ही पुटेजही त्यांना मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी दोन महिलांवर संशय व्यक्त केला आहे.
याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सय्यद करीत आहेत.