कोल्हापुर
ऑनलाईन प्रणालीमुळे पैशांसह वेळेची बचत होते, असं आपण नेहमीच म्हणतो. शिवाय लाचखोरीला काही प्रमाणात आळा बसला असंही अनेकांचं मत आहे. मात्र लाच घेण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या भ्रष्ट कर्मचारी शोधून काढतच असतात.
त्यातच कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये एक साधा ग्रामसेवक तब्बल पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात सापडला.
सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदी करण्यासाठी ग्रामसेवकाला पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. अमृत गणपती देसाई असं लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
गाळ्यांच्या सेपरेट नोंदणीसाठी ग्रामसेवक सातत्याने टाळत होता. त्यामुळे सयाजी देसाई हैराण झाले होते. अखेरीस ग्रामसेवक अमृत देसाईने नोंदणीकरिता वीस लाख रुपये किंवा कमर्शियल गाळा देण्याची मागणी केली.
दरम्यान सयाजी देसाई आणि ग्रामसेवक यांच्यात तडजोड झाली आणि व्यवहार चौदा लाखांत निश्चित कऱण्यात आला.
त्यानंतर सयाजी यांनी लाचलुचपत विभागाला यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार सयाजी कॉम्प्लेक्समध्येच सापळा लावण्यात आला. अखेरीस सोमवारी लाच लुचपत विभागाने पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
महाराष्ट्रातील शहरांलगतचे सर्व ग्रामसेवकांची ग्रामविकास अधिकार्यांची, तलाठ्यांची संपत्ती तपासणी केली तर मोठा फ्राडेड म्हसुल बाहेर निघेल त्यासोबतच मंडळ अधिकारी आणि कार्पोरेशन चे विभागीतील नोंदणी सर्वेअर महसूल नोंदणी सर्वेअर यांची मालमत्ता तपासणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुद्देमाल मोठ्या प्रमाणात बाहेर निघेल