पुरंदर
पुरंदर तालुक्यातील युवकांसाठी श्री विठ्ठल रामचंद्र जगताप( भारतीय जनता युवा मोर्चा पुरंदर तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आंबळे)
यांचे वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पुरंदर तालुका व श्री विठ्ठल जगताप मित्र परिवाराच्या वतीने वाटाड्या या महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योग संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विकास कुलकर्णी यांचे चला घडवूया उद्योजक या विषयावर मोफत एक दिवसीय उद्योजक मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्री बाबाराजे जाधवराव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री धर्मेंद्र खांडरे( संघटन सरचिटणीस भाजपा) उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री किरण दगडे पाटील( पुणे जिल्हाध्यक्ष) श्री गंगाराम दादा जगदाळे( पुरंदर तालुका अध्यक्ष) ,श्री राहुल शेवाळे, संदीप आबा सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपार सत्रामध्ये वाटाड्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर विकास कुलकर्णी यांनी युवकांसाठी विविध उद्योग व्यवसायाबद्दल कृतीयुक्त मार्गदर्शन केले वाटाड्या या संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तरुणांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सन्माननीय योगेश गोगावले( प्रदेश संयोजक) श्री जालिंदर भाऊ कामठे( अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी) श्री साकेत दादा जगताप( सासवड शहर भाजपाध्यक्ष) श्री सचिन लंबाते, श्री संजय अण्णा दिवेकर( मा सदस्य जिल्हा परिषद पुणे) उद्योजक विजित मांढरे श्री विक्रम शेठ मांढरे डॉक्टर विजय दिवेकर सुभाष शेठ जगताप प्रकाश शेठ खेडेकर श्रीकांत शेठ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या युवकांमध्ये भाग्यवान चिठ्ठीच्या आधारे मान्यवरांच्या उपस्थितीत आठ भाग्यवान विजेत्यांना उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी मदत भांडवल म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये श्री विठ्ठल रामचंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले.
संयोजकांकडून सर्वांसाठी चहा पाणी व सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
भारतीय जनता युवा मोर्चा पुरंधर व श्री विठ्ठल रामचंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजक उभारणी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल मान्यवरांनी भरभरून कौतुक केले व या स्तुत्य उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यशाळेस तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वाटाड्या प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने यापुढेही युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय जगताप यांनी केले व आभार विठ्ठल जगताप यांनी केले.