नागपूर
नागपुरात २३ वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील निर्जन स्थळी तरुणी मृतावस्थेत आढळली.
मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या करुन नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निकिता चौधरी असं युवतीचं नाव असून ती राणा प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नागपूरमधील वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील निर्जन स्थळी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. निकिता चौधरी असं युवतीचं नाव आहे. ती राणा प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीत राहत होती.
निकिता एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. मंगळवारी ती कार्यालयात गेली. मात्र, घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी राणा प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
बुधवार रात्री तिचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या करुन नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी कुठल्या कारणांवरून ही हत्या केली, कुणी केली या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.