पुरंदर
नीरा ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा आज पासून बंद झाला आहे.वीज वितरण ने पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा बंद केल्याने.पाणी वितरण बंद पडल्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी सांगितले आहे.त्याच बरोबर थकबाकीदारांनी घरपट्टी भरल्याशिवाय वीज पुरवठा पर्यायाने पाणी पुरवठा शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सहा महिन्यांपूर्वी वीज वितरणने नीरा येथील पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित केला होता.त्यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी तडजोड करून थोडे वीज बिल भरून वीज पुरवठा पूर्ववत केला होता.मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतीने लोकांना थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले होते.मात्र तरीही बहुतांश लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरली नाही.
त्यामुळे पाणीपुरवठ्याची वीज तोडण्याची वेळ पुन्हा आली आणि उद्यापासून नागरिकांना पाण्यासाठी हंडा घेऊन पळापळ करण्याची वेळ आली आहे.
याबाबत आम्ही नीरा शिवतक्राराचे उपसरपंच राजेश काकडे यांच्याकडे विचाराना केली असता ते म्हणाले की,’ दरवर्षी घरपट्टी थकवणाऱ्या लोकांमुळे सामान्य व घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.आता दोन दिवसात या थकीत लोकांनीं घरपट्टी भरली तरच वीज बिल भरून वीज पुरवठा सुरळीत करता येईल.अन्यथा प्रशासन हतबल आहे.लोकांनी घरपट्टी व पाणीपट्टी तातडीने भरली पाहिजे तरच मूलभूत सेवा देता येतील.
अनेक ग्रापांचायात सदस्यांनी याबाबत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन दिवस पाणी येणार नसल्याचे कळवले आहे. पण ग्रामपंचायतीकडे पैसेच नसल्याने दोन दिवसा नंतर काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नीरा ग्रामपंचायतीची थकबाकी आता.१ कोटी ७७ लक्ष इतकी झाली आहे मागील वर्ष भरात ग्रामपंचायतीने १५ लक्ष रुपये इतके वीज भरले होते. मात्र यानंतर वसुली नझाल्याने ग्रामपंचायतीचा इतर खर्चाचा ताळमेळ घालने आणि वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्यातच अनेक वर्षापासून वीजबिल बाकी असल्याने त्याचे व्याजाच जस्त आहे.