पुरंदरमधील “या” गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावुन नेले पळवुन !!!!!

पुरंदरमधील “या” गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावुन नेले पळवुन !!!!!

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असणाऱ्या व सध्या जेजुरी येथे वास्तव्यास असणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिनांक ५ मार्च २०२२ रोजी फिर्यादी यांच्या जेजुरी येथील राहत्या घरातून आरोपी योगेश मोहन आवटे रा.जेजुरी याने सदर अल्पवयीन मुलीस कशाची तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ,सदर प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ना. खांडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *