पुरंदर
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.कोविड १९ तथा कोरोना विषाणू या जीवघेण्या व महाभयंकर काळात देखील पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ,रस्त्यावर उतरून प्रभावीपणे काम केले, अशा अनेक संकटांना तोंड देऊन पत्रकार हे निर्भयपणे काम करीत असतात, परंतु शासनाच्या माध्यमातून किंवा, सरकारच्या माध्यमातून पत्रकारांना आजतागायत कसल्याही पध्दतीची सुरक्षा दिली जात नाही.
त्यामुळे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची विमा पाॅलीसी उतरविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुदामाआप्पा इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आला आहे.अशी माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, जयंत पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. १ मार्च २०२२ रोजी शिवरी येथील शरदचंद्रजी पवार सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात सुदामाआप्पा मित्रपरिवाराच्या मार्फत पुरंदर तालुक्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी, संभाजी झेंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, दत्ताशेठ झुरुंगे, गणेश मोरे, माणिकराव झेंडे, प्रदिप पोपण, दिलीप यादव, बाळासाहेब कामथे, यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव अमोल बनकर व सहसचिव मंगेश गायकवाड यांनी दिली.