औरंगाबाद
ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्यात आली. औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला होता.
त्यानंतर चक्क उभा ऊसाचा फड पेटवून देण्यात आला. अखेर आरोपीला अलगद जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. बाबासाहेब दुबिले असं या धाडसी शेतकऱ्याचे नाव आहे. तर विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
ऊसतोड कामगाराच्या मुलीचं अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला. त्यामुळे अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून त्याला जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे.
बाबासाहेब दुबिले असं या धाडसी शेतकऱ्याचे नाव आहे. विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीने ऊसतोड कामगारांच्या गाडीत झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ऊसतोड कामगार गाडीकडे धावले.
त्यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपीने धूम ठोकली आणि तो ऊसाच्या फडात धाव पळाला. तेव्हा ऊस मालकाने अख्ख्या ऊसाच्या फडला आग लावण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे अपहरण करणारा आरोपी अलगद जाळ्यात सापडला. त्यानंतर ऊसतोड कामगारांनी आरोपीचे हातपाय बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.