ठाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेवरील लोकलच्या ठाणे-दिवा या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण काल करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरेर यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला. यानंतर भूक लागल्यानं ठाणे स्टेशन बाहेरील गजानन वडापाव सेंटरमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव, भजी खालले. मात्र, या वडापावचे बील न भरताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावरुन देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
ठाण्यात मंत्री आणि खासदारांनी वडापाव आणि भजींवर ताव मारला. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला आणि त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारलाय. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ताव मारला आणि बील न देताचं ते निघून गेले.
मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांनी गजानन वडापाव सेंटरवर वडापाववर ताव मारल्यानंतर सर्वजण निघून गेले. यानंतर त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा बिलासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर विरोधकांना आयता मुद्दा मिळायला नको म्हणून कार्यकर्त्यांनी या प्रकरणारवर पडदा टाकण्यासाठी बील भरलं.