पुणे
बारामती येथील माजी नगरसेवक श्रेणीक भंडारी यांची पत्नी अश्वीनी श्रेणीक भंडारी ,मुलगा मिलिंद भंडारी व बहिण कवीता शहा यांचा मोरगाव जवळ कार ट्रॉलीला धडकुन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
कवीता उदय शहा वय 62, अश्विनी श्रेणिक भांडारी वय 48, मिलींद श्रेणिक भांडारी वय 24 सर्व रा. सुभाष चौक बारामती यांचा मृत्यु झाला आहे तर बिंदीया सुनिल भांडारी वय 40 वर्षे या जखमीं झाल्या आहेत. रात्री 10.30 वा सुमारास तरडोली गावचे हद्दीत पुणे बारामती रोडवर खटकळीचे ओढयामध्ये हा अपघात घडला.
सविस्तर हकीकत मिलींद श्रेणिक भांडारी याचे ताब्यात असलेली वेगनार कार नं एम.एच.12 पी.टी.7073 या वाहनाने पुणे बाजूकडुन बारामती बाजुकडे चालवित घेवुन जात असतान कारच्या समोर उसाने भरलेला ट्राक्टर महिंद्रा अर्जुन नं.एम.एच. 42बी.बी. 8557 याट्राक्टरचे मागील ट्रोलर नं एम.एच 42 क्यु 5713 या वाहनास पाठीमागुन धडक देवुन अपघात करुन अपघातामध्ये खबर देणार यांची1) आई अश्विनी श्रेणिक भांडारी वय 48 2)आत्या कवीता उदय शहा वय 62 3)भाऊ मिलींद श्रेणिक भांडारी वय 24 सर्व रा. सुभाष चौक बारामती ता.बारामती जि.पुणे हे मयत झाले असुन 4) वहिनी बिंदीया सुनिल भांडारी वय 40 रा. सदर ही अपघातात गंभीर जखमी होवुन सिद्दीविनायक हाँस्पीटल मोरगाव येथे अँडमीट केले आहे.
पुढील तजवीज व्हावी,वगैरे मजकुराचे खबरीवरुन फेटल मोटार अपघात रजि.दाखल.अपघाताचा पुढील तपास पोसई शेख हे करीत आहेत.
पुढील उपचारासाठी जखमी बिंदिया भंडारी याना रुबी हॉस्पिटल मधे ॲडमीट केले आहे. परिवाराकडुन मिळालेल्या माहीतीत सोन्याचा माल असलेली बॅग देखील गायब झाल्याचे समजले आहे. हे कुटुंब एका घरगुती कार्यक्रमास्तव पुण्याला गेले होते सदर चा कार्यक्रम मंगळवारी दुपारी झाल्यानंतर सराफ व्यवसायानिमित्त दुकानच्या कामासाठी बाहेर पडले. बारामतीकडे परतताना अपघात झाला.
मिलिंद भंडारी हा अपघातानंतर फोन चे लॉक उघडुन देवुन त्रयस्थ ईसमाने घरच्या लोकांशी संपर्क करुन दोघी ऑन दी स्पॉट गेल्याचे सांगीतले तर तो स्वत: घरच्याशी मी आहे असे बोलत होता दीड तासानंतर तो ही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता स्टेअरींग पोटावर जोरात आदळल्याने तो जखमी होता.