“या” ग्रामपंचायतीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करुन युवक दिन साजरा

“या” ग्रामपंचायतीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करुन युवक दिन साजरा

उस्मानाबाद

उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीमधे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सुनिता पावशेरे यांनी मार्गदर्शन केले.जिजाऊ यांचा सर्व महिलांनी तर स्वामी विवेकानंद यांचा युवकांनी आदर्श घ्यावा असे मनोगतात सांगितले.

सुमित घोटमाळे ,रुतुजा मुसांडे ,शिवकांताबाई दळवे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, कृषी मित्र गहिनीनाथ बिराजदार, सिद्धार्थ गायकवाड, धनराज वाघमारे, पल्लवी डोणगावे, प्रियंका घंटे,लक्ष्मण भालेराव,लता बलसुरे,रसिका ढोणे, पल्लवी पाटील,निधाबाई, गायकवाड,आदी उपस्थित होते.सुत्र संचालन देविदास पावशेरे यांनी केले तर पदमीन डोणगावे यांनी आभार मानले.
स्वामी विवेकानंद जयंती -राष्ट्रीय युवक दिनानिमित्त धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

माजी सैनिक हवालदार शिवाजी बिराजदार यांनी 2 कि.मी.धावणे स्पर्धेचे सरपंच, पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.या स्पर्धेत प्रथम-शिवराज नंदगावे,द्वितीय -बुदधभूषण सुर्यवंशी तृतीय -साहिल सुर्यवंशी हे विजयी झाले.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुनिता पावशेरे, पोलीस पाटील पांडूरंग पाटील ,माजी सैनिक शिवाजी बिराजदार , देविदास पावशेरे यांच्या हस्ते *प्रमुख विजयी स्पर्धकांना स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा आणि रोख बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला.

माजी सैनिक हवालदार शिवाजी बिराजदार , राहूल डोणगावे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी पल्लवी डोणगावे, शिवाजी बोकडे, सिद्धार्थ गायकवाड, राहुल डोणगावे, अभिजित पावशेरे,कृषिमित्र गहिनीनाथ बिराजदार आदीसह युवक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी गुरव अरविंद दळवे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *