पुरंदरच्या राजेवाडी रॉयल्स संघाने जिंकला प्रथम क्रमांकाचा ‘सरपंच चषक’ !!!!!! दत्तात्रय जगताप यांची वयाच्या पन्नाशीतही दमदार कामगिरी

पुरंदरच्या राजेवाडी रॉयल्स संघाने जिंकला प्रथम क्रमांकाचा ‘सरपंच चषक’ !!!!!! दत्तात्रय जगताप यांची वयाच्या पन्नाशीतही दमदार कामगिरी

पुरंदर

दिवे येथे दिवे गावचे विद्यमान सरपंच अमित झेंडे यांनी अमित फौंडेशन यांच्या वतीने ‘सरपंच चषक’ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. यात १६ संघांनी सहभाग घेतला होता. राजेवाडी रॉयल्सने ‘सरपंच चषक’ व ५५,५५५ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले.

दिवे ( ता. पुरंदर ) येथे अमित फौंडेशन यांच्या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धांचे बक्षिस वितरण पुरंदर-हवेलीचे आ. संजय जगताप व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व भाजपाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले.

राजेवाडी रॉयल्स व काळेवाडी पँन्थर्स यांच्यात शेवटचा सामना झाला. ६३ विरुद्ध ६२ असा चुरशीचा सामना होऊन यात राजेवाडी रॉयल्सने हा ‘सरपंच चषक’ जिंकला. काळेवाडी पँन्थर्सने व्दितीय क्रमांक ४४,४४४ रुपये व चषक पटकावला. तर तृतीय क्रमांक भिवरी स्टार क्रिकेट संघाने ३३,३३३ रुपये व चषक. चतुर्थ क्रमांक दौंडज ड्रॅगन्सने संघाने २२,२२२ रुपये व चषक मिळविला.

तसेच बेस्ट बॅट्समन अमीर शिकलकर (राजेवाडी रॉयल्स), बेस्ट बॉलर अजय गायकवाड (झेंडेवाडी रायडर्स), मॅन ऑफ द सिरीज कुणाल कापरे (दौंडज ड्रॅगन्स).

गेली पाच दिवस हे सामने दिवे येथे झाले. यात १६ संघांनी सहभाग घेतला. ज्या लोकांनी प्रायोजक म्हणून या ‘सरपंच चषक’ स्पर्धेला मदत केली. या सर्वांचे मी कौतुक करतो : आमदार संजय जगताप

यावेळी गणेश जगताप, गुलाब झेंडे, रुपेश राऊत, नितीन काळे, पूनम झेंडे, कौसल्या झेंडे, योगेश काळे, सुजाता जगदाळे, भारती आडागळे, श्रद्धा पोमण, शोभा टिळेकर, सुमन टिळेकर, शोभा लडकत, राजाभाऊ काळे, अमर झेंडे, शरद झेंडे, अजित गोळे, अविनाश झ़ेडे, विलास झेंडे, प्रवीण सणस, मंदार पवार, गणेश कटके, राहुल कदम आदी उपस्थित होते.

काळेवाडी व राजेवाडी यांच्यात झालेला सामना मी पाहिला अतिशय चुरशीचा झाला. खरे तरी या खेळाडू मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे आव्हान बाबाराजे जाधवराव यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *