पुरंदर
गुरोळी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरोळी गावातील पन्हाळवाडी येथे एका घरामधील कानीफ भाउसो खेडेकर यांचे घराची कडी तोडून वीस हजार रुपये रोख तसेच अर्ध्या तोल्याची अंगठी चोरून नेले. तर वाघदरवाडी येथे सुनिल महादेव महाडीक यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून तीन हजार रुपये रूपये चोरीला गेले.
महाडिकवस्ती येथे रामभाऊ खराडे यांचे बंद घर फोडले पण त्यात त्यांना काय मुद्देमाल सापडला नाही. हि वार्ता समजल्या नंतर गुरोळी गावचे उपसरपंच मधुकाका खेडेकर यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेवर फोन करून सर्व ग्रामस्थांना मॅसेजद्वारे कळवल्यामुळे ठीक ठिकाणी लोकांनी एकत्र आले व सावध झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गुरोळी गावातील लोकांच्या माहितीवरून असे समजले की गावात 5.30 च्या सुमारास आठ ते दहा मुल भंगार गोळा करण्यासाठी आले होते त्यांनीच हा प्रकार केलेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
दोन तीन ठिकाणी कडी उघडण्याच्या हि प्रयत्न झाला पण ग्रामस्थ सावध आल्यामुळे व चोरट्यांना कुणी तरी जागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.
गावात दोन ठिकाणी चोरी झाल्याचे सकाळी लक्षात येताच पोलीस पाटील कैलास जाधव यांनी सासवड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार सुनिल चिखले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे.