पुरंदर तालुक्यात “या” गावात गवत का कापले असे विचारल्याच्या कारणावरून विळ्याने हल्ला

पुरंदर तालुक्यात “या” गावात गवत का कापले असे विचारल्याच्या कारणावरून विळ्याने हल्ला

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील एक धक्कादायक घटना आहे शेताच्या बांधावरील गवत काढण्याच्या कारणातून झालेल्या वादातून ज्येष्ठ नागरिकांवर विळ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दत्तात्रय साधु गायकवाड वय ७० वर्षे धंदा शेती राहणार हिवरे,तालुका पुरंदर,जिल्हा पुणे.यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार १८ डिसेंबर २०२१ रोजी पुरंदर तालुक्यातील हिवरे गावातील  शेत जमीन गट नंबर १७१ च्या बांधावर फिर्यादी दत्तात्रय साधू गायकवाड यांनी “माझे बांधावरील गवत का कापले” असे विचारल्याच्या कारणावरून
आरोपी सदाशिव गेनबा लिंबोरे, राधीका सदाशिव लिंबोरे, खंडोबा मल्हारी लिंबोरे सर्व राहणार हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी फिर्यादीस गवत काढण्याच्या विळयाने हातावर पाठीवर मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याने फिर्यादी दत्तात्रय गायकवाड यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सासवड पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *