जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक

जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक

पुणे

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत दोन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणी सहतिघांना गुन्हे शाखेच्या युनिटने रंगेहात पकडले आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे (वय 56,रा.पिंपळे निलख) यांनी लष्कर पोलिसात तक्रार दिली होती. नेहा आयुब पठाण (वय 25,कात्रज) मेहबुब आयुब पठाण (वय 52) आणि आयुब बशीर पठाण (वय 55,दोघेही रा.अकलुज,ता.माळशिरस) यांना अटक केली आहे.

आरोपी नेहा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. तिने विभागातील अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांच्या विरोधात हात पकडला,अश्लिल बोलले अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.त्यानंतर तरुणीला सर्वांसमोर विधाटे यांनी विचारणा केल्यानंतर आपण खोटे तक्रार केल्याचे तिने मान्य केले होते.

त्यानंतर या तरुणीने पुन्हा तक्रार असल्याचे सांगितले. त्यामुळे विधाटे यांनी या प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.या दरम्यान विधाटे यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार सांयकाळी नेहा पठाण तक्रार करणार आहे.

हे प्रकरण आपआपसातच मिटवून घ्यायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी विधाटे यांनी नेमके किती पैसे हवेत अशी विचारणा केली. तीन लाखात हे प्रकरण मिटवून टाकू अशी बतावणी केली. शेवटी तडजोड करत व्यवहार दोन लाखांवर येवून फिक्स झाला. फोनवरील ही चर्चा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर झाली होती.

या घटनेनंतर फिर्यादी विधाटे यांनी घडला प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घतला.त्यानंतर गुन्हे शाखा विभागाने आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. योजनेनुसार कागदी नोटांचे बंडल तयार करून विधाटे यांच्याकडे दिले. ठरल्यानुसार आरोपींना पैसे देण्यासाठी लष्कर परिसरातील एसजीएस मॉल येथील एका कॉफी शॉपमध्ये बोलविले.

सांगितल्याप्रमाणे आरोपी नेहासह आणखी तीन लोक तिथे आले. फिर्यादी विधाटे यांनी आरोपींना पैसे दिले. त्यानंतर गुन्हेशाखेच्या टीमने त्यांना अटक केली. कारवाई दरम्यान तिच्यासोबत तिचे आईवडील असल्याचे समोर आले. तर आरोपी नेहाच्या भावाने विधाटे यांना फोन करून पैश्यांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *