जेजुरी
प्रतिनिधि मयुर कुदळे
कोरोनाच्या ओमिक्रोन या नवीन व्हेरियंटच्या विषाणूचे रुग्ण देशात आणि नंतर राज्यासह आता पुणे जिल्ह्यात आढळल्याने ग्रामीण भागात नागिरकांनी त्याची चांगलीच धास्ती घेतली असून, लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आता लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून जेजुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय तसेच आसपासच्या प्राथमिक आरोग्य व कोरोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत.
काही लोकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे टाळले होते तर काहींनी एकही डोस घेतला नसल्याने अशा लोकांनी मागील आवड्यापासून ओमिक्रोनच्या धास्तीने लसीकरण करून घेण्यास सुरुवात केली आहे.
जेजुरी येथील लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच लोकांच्या रांगा लागत असून उपलब्ध लसीचा पुरवठा पाहून नागरिकांना टोकन वाटप केले जात आहे.