वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या “या” गावच्या उपसरपंचाला आठ जणांनी मिळुन केली बेदम मारहाण

वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या “या” गावच्या उपसरपंचाला आठ जणांनी मिळुन केली बेदम मारहाण

अहमदनगर

नदीपात्रातील वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या राहुरी तालुक्यातील एका उपसरपंचाला आठ जणांनी मिळून लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दिनांक १२ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे घडली.

सागर रामकिसन कल्हापुरे राहणार देसवंडी तालुका राहुरी, हे देसवंडी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहेत.देसवंडी परिसरात असलेल्या नदी पात्रातून त्यांनी वाळू उपसा करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे वाळू तस्कर वैतागले होते.

दिनांक १२ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजे दरम्यान देसवंडी गावातील वेशी जवळ या घटनेतील सुणारे आठ आरोपींनी उप सरपंच सागर कल्हापुरे यांना गाठले.तुझ्यामुळे आम्हाला नदी पात्रातून वाळू भरता येत नाही. असे म्हणून सागर कल्हापुरे यांना शिवीगाळ केली.

तसेच लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तू जर परत आम्हाला वाळू भरण्यासाठी आडवा आलातर तुझ्या अंगावर टेम्पो घालून, तुला जीवे ठार मारून टाकू. अशी धमकी दिली.

असे राहुरी पोलिसात सागर कल्सापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सागर रामकिसन कल्हापुरे यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब गोपीनाथ कोकाटे, अनिकेत कैलास कोकाटे,अक्षय संजय बर्डे, रवी संजय बर्डे, शिवाजी सोमनाथ वंजारी सर्व राहणार देसवंडी तालुका राहुरी.

तसेच इतर तीन अनोळखी इसम अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हनुमंत आव्हाड हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *