पुणे
दौंड तालुक्यातील यवत येथील घिगेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापक अशोक मानसिंग पवार सद्या रा.पुणे यांचेवर मद्यपी अजय कांतीलाल घिगे याने दारूच्या नशेत येऊन धिंगाणा घालत वर्गात घुसून शिवीगाळ करत मानेवरती नख्याने ओरखडून जखमी केले आहे, सदर बाबत मुख्याध्यापक अशोक मानसिंग पवार यांनी स्वतः ही माहिती दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
मुख्याध्यापक अशोक मानसिंग पवार हे दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे संघटक पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे आता संघटना याबाबत आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करोना संकटात जीवाची पर्वा न करता शिक्षक सेवा दिली,अपुऱ्या साधनांशिवाय ऑनलाइन शिक्षण सेवा पुरवली आणि अश्या परिस्थितीत अशी घटना घडणे निंदनीय आहे, याबाबत स्थानिक नागरिकांनी देखील शाळेत अशा घटना घडू नये यासाठी तत्पर राहिले पाहिजे.