पुरंदर तालुक्यातील “या” गावात होतोय विवाहित महिलेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ

पुरंदर तालुक्यातील “या” गावात होतोय विवाहित महिलेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील गराडे येथील एका विवाहित महिलेला तिच्या माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी त्याचबरोबर तिचा १२ वर्षे वयाचा मुलगा तिच्याकडून हिसकावून घेऊन त्याला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , पुरंदर तालुक्यातील गराडे येथे राहणाऱ्या मोनाली महेंद्र कुमार साळवे या विवाहित महिलेने यासंदर्भात तक्रार दिली आहे.

तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा  पती,  सासरा आणि सासू  हे तिला सन 2008 पासून ते सन 2020 पर्यंत माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करीत होते. त्याच बरोबर तिचा बारा वर्षीय मुलगा सुध्दा त्यांनी तिच्या पासून हिसकावून घेऊन तिला घराच्या बाहेर हाकलून दिले आहे.

त्यामूळे तिने  पति महेंद्रकुमार भगवान साळवे वय 37 वर्षे,सासरे भगवान लक्ष्मण साळवे,सासु सुमन भगवान साळवे सर्वजण राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचे विरोधात दिनांक 27 नोव्हेंबर रोजी  तक्रार दिली आहे.. 

पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घुले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *