दत्ताञय फडतरे यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन
पुणे ( प्रतिनिधी )
महानगरपालिका हददीपासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणारे गराडे गाव व परिसरातील नागरिकांना पुणे व सासवड शहरात ये- जा करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या भागातील प्रवाशांची गैरसोय सुरु आहे .यामुळे काञज -बोपदेव घाट -गराडे – कोडीत मार्ग -सासवड पी.एम.पी बसेस सुरु करुन या भागातील नागरिकांची अनेक वर्षोपासुन प्रवासासाठी होत असलेली गैरसोय कायमची दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे यांनी पी.एम.एम.एल.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
राज्यभरात एस.टी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या बंद मुळे या भागात काही प्रमाणात सुरु असलेली एस.टी ची सेवा पुर्णत: कोलमडली आहे. या भागात कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे परिसरातील शाळा ,महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थींनी , जेष्ठ नागरिक, महिलावर्ग पुर्णत: वैतागले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस मोरगाव ,जेजुरी ,लोणावळा , कापुरव्होळ ,तसेच दौंड तालुक्यापर्यंत पोहचल्या आहेत .परंतु , महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणार्या गराडे परिसरातील नागरिकांची प्रवासासाठी “ना घर का ना घाट का” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दत्ताञय फडतरे यांनी म्हटले आहे.
सासवड आगारातुन सुटणार्या एस.टी बसेस सोमर्डी, गराडे , वारवडी दरेवाडी ,परिसरात दिवसातुन एक- दोन फेर्या होत होत्या,त्याही लाॅकडाउनमुळे अनेक दिवस बंद होत्या, आता संपामुळे पुर्णपुणे बंद झाल्या आहेत.तसेच एस.टीच्या अनियमित फेर्या असल्यामुळे ग्रामस्थांनी एस.टी सेवेवर विसंबुन राहणे जवळपास बंदच केले आहे.सासवड- गराडे -काञज या मार्गावर पी.एम.पी सुरु असणे ही काळाची गरज आहे.
गराडे ,कोडीत परिसरातील नागरिक पी.एम.पी.दवारे सासवड शहर व पुणे शहरास जोडले गेल्यास याभागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा , दुध व्यावसायिक , हाॅटेल व्यावसायिक ,नोकरदार ये-जा करण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होवुन हजारो प्रवाशांना हक्काची सेवा मिळेल.प्रयोगादाखल काञज -भिवरी -गराडे -कोडीत -सासवड मार्गावर एका तासाच्या अंतराने पी.एम.पी बसेस सुरु करण्याची मागणी फडतरे यांनी निवेदनादवारे पी.एम.पी.एम.एल प्रशासनाकडे केली आहे.