औरंगाबाद
शुक्रवारी सकाळी पत्नी पीडित आश्रमात जागतिक पुरुष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शीर्षासन आंदोलन करत हा विशेष दिवस पुरुषांनी साजरा केला. आंदोलकांनी या वेळी पुरुषांच्या हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या.
महिला दिन साजरा करण्यात अनेक पुरुषांचाही सहभाग असतो. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु कुठल्याही शासकीय कार्यालयात पुरुष दिन साजरा झालेला नाही. त्यामुळे महिला आणि पुरुष हा भेदभाव आता तरी संपला पाहिजे. असे मत यावेळी उपस्थित पुरुषांनी व्यक्त केले.
दिवसेंदिवस पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढत चालली आहे , पत्नी पीडित पुरुष आश्रमात जवळ जवळ देशभरातून ९६०० पर्यंत पुरुषांच्या तक्रारी आल्या. महिन्याला २०० ते २५० तक्रारी आश्रमात येतात .खर तर याहून अधिक लोक पत्नी पीडित आहे. कारण पुरुष हा समाज काय म्हणेल या भीती पोटी समोर येत नाही.
ज्यांना त्रास असह्य झाला तोच व्यक्ती तक्रार देण्यासाठी समोर येत आहे . बहुतांश वेळा इज्जत जाईल या भीती पोटी पुरुष त्याचे दुःख कुणालाही सांगत नाही व त्याचा परिणाम तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो.
यामुळे काम करण्याची तत्परता जाते. देशाचे दर डोई उत्पन्न देखील घटते व पुरुष न्यायाच्या अपेक्षेने भटकतो.
परंतु पदरात केवळ, अन्याय,अत्याचार व विरह पडल्याने अखेर बहुतांश पुरुष हतबल होऊन आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबतात. आता पुरुष वाचवायचा असेल पुरुषांना कायद्याचे संरक्षण देऊन समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हे पुरुष दिनानिमित्त पत्नी पीडित आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जागतिक पुरुष दिन साजरा करून पुरुषांवर होणारा अन्याय अत्याचार कसा संपवता येईल, तसेच पत्नी कडून होणारा त्रास, केसेस झाल्यावर पुरुषांनी केस कशा लढायच्या यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक ऍड. भारत फुलारे,चरणसिंग गुसिंगे,पांडुरंग गांडूळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.