निरा पंचक्रोशीतील सद्भावना एसटी सेवा आणि सेवकांच्या पाठीशी

निरा पंचक्रोशीतील सद्भावना एसटी सेवा आणि सेवकांच्या पाठीशी

पुरंदर

पांडुरंगाच्या वारकऱ्याला पंढरपूरला, डोंगरदऱ्यातील प्रसववेदना ने तडफडणाऱ्या मातेला, सर्पदंशाने जीव कासावीस झालेल्याला सरकारी दवाखान्यापर्यंत, शिक्षणासाठी आणि सहलीसाठी विद्यार्थ्यांना , वृद्ध अपंग यांना सवलतीच्या दरात आणि इतर घटकांना आपले प्रगतीसाठी फक्त एसटी च पोचवेल खाजगी बस नाही.

सध्या एसटी बस कामगारांचा आपल्या न्याय मागण्यासाठी संप चालू आहे. एसटी बसचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे. तत्पूर्वी महाराष्ट्र शेजारील राज्यांच्या परिवहन बस कामगारा प्रमाणे महाराष्ट्रातही एसटी कामगारांना वेतन व इतर आर्थिक लाभ मिळावेत.

एसटी कामगार यांचे निलंबन मागे घ्यावे. आत्महत्याग्रस्त आणि कर्तव्यावर मरण पावलेल्या एसटी कामगारांच्या वारसांना राज्य शासनाच्या सेवेत अनुकंपा तत्वावर घेण्यात यावे. या त्यांच्या रास्त मागण्या महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून मान्य कराव्यात आणि जनसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एसटी बस प्रवासी सेवा सुरळीत करावी.

एसटी वाचावी आणि एसटी कामगारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील समस्त एसटी प्रेमी हितचिंतकांनी आज दिनांक14.11.2021 रोजी नीरा बस स्थानक येथे महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले.

सदर निवेदन श्री. डी. एच. भोसले, वाहतूक निरीक्षक, सासवड आगार यांनी स्वीकारले. श्री. रमाकांत गायकवाड सो, विभागीय परिवहन अधिकारी पुणे विभाग यांनी आपल्या भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवल्या जातील , तसेच येथून पुढेही नीरा पंचक्रोशीतील नागरिकांना एसटी प्रवासा बाबतीतील कोणत्याही अडचणीबाबत सहकार्य केले जाईल अशी दूरध्वनीवरून हमी दिली.

सदर वेळी नीरा पंचक्रोशीतील नागरिक श्री सुरेंद्र जेधे,श्री नाना जोशी,श्री उदय गायकवाड,श्री मंगेश ढमाळ,श्री अण्णा माने,श्री निनांत चव्हाण,श्री पप्पू सोनवणे,श्री शाम जाधव,श्री सुभाष जेधे, श्री सुनील गवळी,श्री राजेंद्र धुमाळ,श्री सुनील थोरात,श्री सचिन धायगुडे,श्री मच्छिंद्र लकडे,श्री कुंडलिक चौरे,श्री प्रमोद शहा,श्री वसंत मनोहर देशपांडे आणि श्री टी. के. जगताप हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *