पुरंदर
पुरंदर तालुक्यातील राजुरी याठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचा भव्य महाकुंभ म्हणजेच खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
भैरवनाथ क्रिकेट क्लब,राजुरी यांच्या वतीने या खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी भव्य फुलपिचचे सामने होणार असुन प्रथम क्रमांकासाठी तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक सामना हा सहा षटकांचा होणार असुन रजिस्ट्रेशन करणार्याच संघांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम रजिस्ट्रेशन करणार्या ५० संघांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. रजिस्ट्रेशन पुर्ण झाल्यानंतर सामन्यांची तारीख कळवली जाणार असल्याचे संयोजकांनी सांगीतले.
खासदार चषकाचे मुख्य संयोजन संतोष कोलते,उध्दव भगत,सागर चव्हाण,सुधाकर भगत,अमोल चव्हाण यांनी केले आहे.

